Saturday 20 October 2018

निलंबनाबाबत शासन निर्णय...

1) निलंबन कालावधी नियमित करण्याचे अधिकार प्रत्यायोजित करण्याबाबत...
2) निलंबन रदद करुन शासन सेवेत पुनस्थापित करण्याबाबत..
3) विभागीय चौकशी प्रकरण अथवा न्यायीक कार्यवाही प्रलंबित असताना, निलंबन रद्द झाल्याने पुनर्स्थापित झालेलया कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या वेतनवाढ अनुज्ञेयतेबाबत..
4) विभागीय चौकशी प्रकरण अथवा न्यायिक कार्यवाही प्रलंबित असताना निलंबन रद्द झाल्याने पुनर्स्थापित झालेलया कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या वेतननिश्चीतीबाबत..
5) दि 1 जानेवारी 2006 नंतर असाधारण रजेवर किंवा सेवानिवृत्‍त अथवा निलंबनाखाली असलेल्‍या कर्मचा-यांना वेतन लाभ अनुज्ञेय करण्‍याबाबत..
6) निलंबित शासकीय सेवकांच्या प्रकरणांचा आढावा..
7) निलंबन कालावधी धरुन अनुपस्थितीच्या कालावधीबद्दल दयावयाचे वेतन व भत्ते यांचे प्रदान विनाविलंब करणेबाबत..

29 comments:

  1. निलंबित कालावधीमध्ये मुख्यालयात हजर राहणे आवश्यक आहे का ?

    ReplyDelete
  2. होय. हजेरी आवश्यक आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. असा शासन निर्णय आहे का

      Delete
    2. निलंबन काळात मुख्यालयात 2 वेळेस हजेरी साठी हजर राहणे आवश्यक असल्या संबंधित शासन निर्णय आहे का सरजी (GR)

      Delete
  3. सरजी आम्ही पती पत्नी दोघेही पुर्वी एकाच मुख्यालयी (पंचायत समितीत)कार्यरत होतोत
    निलंबित करण्यात आले त्यावेळी देखील एकाच मुख्यालयात होतोत. आता निलंबनानंतर दोघांना वेगवेगळ्या दोन तालुक्यातील सुमारे 75 किमी अतरावर पदस्थापना मिळाली आहे.अश्या परिस्थितीत पतिपत्नी एकञीकरणासाठी काय करता येईल

    ReplyDelete
    Replies
    1. नैसर्गिक न्याय तत्वानुसार आपणास शक्य असल्यास एकाच मुख्यालयात नियुक्ती मिळायला हवी.न मिळाल्यास पतीपत्नी एकत्रीकरणाचा हवाला देवून आपण नियुक्ती प्राधिका-याकडे तशी रितसर मागणी करावी.मागणीची पुर्तता न झाल्यास न्यायालयात धाव घेता येईल.

      Delete
  4. सर एखाद्या कर्मचाऱ्याचा निलंबन कालावधी कर्तव्यकालावधी गणण्यात आल्यास त्याला फरकाच्या रकमेत वेतनवधीचपन समावेश करतात का?

    ReplyDelete
  5. सर निलंबित झाल्यावर नवीन नोकर भरतीसाठी अर्ज करता येतो का??

    ReplyDelete
  6. शासकीय सेवेतून कामावरून कमी केल्यानंतर कामगाराणे न्यायालयात दावा दाखल केल्यावर निकाल जर कामगारांचे बाजूने लागून त्याला सेवेत पुनर्स्थापित केल्यावर त्याला कमी केलेल्या काळातील वेतन व भत्ते मिळतात का व त्याची वेतननिश्चिती कश्या प्रकारे केली जाते?

    ReplyDelete
  7. उपयोगी एवमं पठनीय है।
    सधन्यवाद।

    ReplyDelete
  8. प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्या नंतर नियुक्ती पत्र न घेता पदावर हजर न झाल्यास 1 वर्ष भरात 3पत्र आले होते मी प्रतिसाद दिला नाही तर आपली सेवा समाप्त होती आणि आता जर मला माझा हक्क दाखवायचा असेल तर काय करावे लागेल

    ReplyDelete
  9. शासकीय कर्मचारी एका ध्या पक्षाचे पद घेऊन काम करू शकतो का.तालुका किवा जिल्हा अध्यक्ष पद.

    ReplyDelete
  10. निलंबित कर्मचारी स्वत:चे घर असताना घरभाडे भत्ता मिळण्यास पात्र असतो का?

    ReplyDelete
  11. निलंबन कालावधीचे प्रसूती रजा देय आहे काय

    ReplyDelete
  12. निलंबित कालावधी ६० दिवसाचा झाल्यानंतर पुनर्स्थित करावायाचा gr मिळेल का

    ReplyDelete
  13. शासकीय सेवकाला केव्हा निलंबित केले जाते ? विभागीय चौकशि सुरू असतांना निलंबित करणे आवश्यक असते काय?

    ReplyDelete
  14. माझ नाव हरीश धार्मीक आहे मी वनविभाग मध्‍ये लिपीक या पदावर कार्यरत असून मला 16 ऑगस्‍ट 2016 ला निलबीत करण्‍यात आले हेाते त्‍यावेळी माझे मुख्‍यालय बदलविण्‍यात आले ज्‍या ठिकाणी मुख्‍यालय देण्‍यात आले होते तिथ हजेरी करीता एक रजिस्‍ट ठेवण्‍यात आले हेाते त्‍यावर मला रोज स्‍वाक्षरी करण्‍यास लावत असत सदरील बाब ही मनासे नियमाला तसेच कायदयानुसार संयुक्‍त आहे का तसेच अश्‍यात माझ्यात आणि शासन मध्‍ये कर्मचारी आणि मालक हा संंबंध कायम होते का जर नियमानुसार होत असेल तर उक्‍त निलबन काळात हजेरी पुस्‍तीकेेवर स्‍वाक्षरी असल्‍याने मला त्‍या कालावधीत पुर्ण वेतन घेता येइ्रल का याबाबत मनासे नियम तसेच कायदयात तरतुद असल्‍यास मला मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
    Replies
    1. चुकीचे आहे . मस्टरवर रोज सहीची आवश्यकता नाही

      Delete
  15. निलंबित कालावधी 90 दिवसाचा झाल्यानंतर पुनर्स्थित करावायाचा gr मिळेल का

    ReplyDelete
  16. दिव्यांग कर्मचारीकडे अतिरिक्त पदभार व कनिष्ठ पदाचा पदभार देता येतो का?

    ReplyDelete
  17. सर मी वर्ग ४ चा कर्मचारी आहे नोकरी वर असताना एक आजार होऊन ४०% disbility आली आहे तर सर टेकनिकल cadre तेकनिकल आहे सद्ध्या समोर क्लर्क च्या cadre मध्ये नियुक्ती मिळणार काय

    ReplyDelete
  18. मी सन २०१६ मध्ये ५ महिने निलंबित होते ,आता माझी शिक्षा रद्द करून रजा कालावधी गणण्यात आले आहे ,त्यावेळी मी ५० % तीन महिने ७५%दोन महिने असे वेतन घेतले ,आता मला फरक काढायचं असून gpf हफ्ता तेव्हा जमा न केल्याने आता जमा करायचा आहे परंतु gpf arrears जमा होत नाही आहे .कारण माझे बसिक ४४८०० आहे ,१७००० *५ महिने ऐकूण ८५००० इतकी होत आहे .तर कसे जमा करावे मार्गदर्शन मिळावे .फरक ८३००० इतके मिळणार आहे

    ReplyDelete
  19. 🙏🙏 सर नमस्ते, विलंबित कोतवाल कर्मचाऱ्यांना पूर्ण स्थापित केल्यानंतर त्यांना पाठीमागे निलंबन काळाचा निर्वाह आता मिळू शकतो का, मिळाला तरी किती टक्के मार्गदर्शन व्हावे 🙏🙏

    ReplyDelete