Thursday 5 January 2017

तुम्हाला तुमच्या आधार कार्डावरील पत्ता, नावात बदल किंवा आणखी काही बदल करायचा असेल तर फार कष्ट घेण्याची गरज लागणार नाही... कारण, हे सर्व तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनंही करू शकता.

कसे कराल बदल...

-  https://uidai.gov.in/ या बेवसाईटवर जा
- 'Update Your Aadhaar Card' या टॅबवर क्लिक करा
- नवं पेज उघडल्यानंतर तुम्ही दोन पद्धतीनं आधार कार्डावरील चुका दुरुस्त करू शकता... पहिली पद्धत म्हणजे फॉर्म डाऊनलोड करून ऑफलाईन पद्धतीनं... आणि दुसरी म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं... 
- 'Fill up 4-Step Online Request' च्या खाली चार स्टेप दिल्या आहे. त्यातील Update Aadhaar Data या ऑप्शनवर क्लिक करा
-  नवं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाल तीन प्रश्न दिसतील... आणि त्यांची उत्तरंही... 
1) ज्यांच्याकडे मोबाईल आहे ते आपलं आधार कार्ड अपडेट करू शकतील. व्यक्ती आपलं नाव, पत्ता, लिंग, जन्मदिवस, मोबाईल क्रमांक आणि ईमेल या पोर्टलच्या मदतीनं अपडेट करू शकतात
2) डिटेल्ससाठी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी 'click here' वर क्लिक करा
3) अपडेट रिक्वेस्टसोबत तुम्हाला कोणती कागदपत्रं ऑनलाईन पाठवायचीत त्यांची माहिती तुम्हाला तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात मिळेल.
- यानंतर तुम्हाला 'To submit your update/ correction request online please' च्या समोर  Click Here वर क्लिक करावं लागेल
- .यानंतर उघडलेल्या 'Aadhaar Self Service Update Portal'वर तुम्ही पोहचाल. इथे तुम्हाला अगोदर 12 अंकांचा आधार क्रमांक टाकावा लागेल. 
- टेक्स्ट व्हेरिफिकेशन कोड टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल
- यानंतर तुम्हाला तुमचं नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी यातील जी माहिती बदलायचीय त्यावर क्लिक करा
- Data Update Request उघडल्यानंतर त्यावर तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल
- सबमिट केल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती एका पानावर दिसू शकेल... त्यात काही चुका असल्यास त्या दुरुस्त करा
- सबमिट केल्यानंतर  Document Upload चा सेक्शन समोर दिसेल. इथे तुम्ही तुमच्या कागदपत्रांचे फोटो किंवा स्कॅन कॉपी अपलोड करू शकाल
- इथे तुम्हाला बीपीओ सर्विस प्रोव्हायडरचं नाव सिलेक्ट करावं लागेल.
- यानंतर तुम्हाला मोबाईलवरही एक मॅसेज मिळेल... या मॅसेजमध्ये असलेल्या URN क्रमांकानं तुम्ही तुमची रिक्वेस्ट ट्रॅक करू शकाल. 


1 comment:

  1. बीपीओ सर्विस प्रोव्हायडरचं म्हणजे कोण ?

    ReplyDelete